मुंबई : सोने खरेदीमध्ये अनेकांना नेहमीच रस असतो. पण आता संधी आहे. कारण सोन्याच्या दरांनी विक्रमी उंची गाठल्यानंतर आता सोने सुमारे 6500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. येत्या काही दिवसांत दर आणखी खाली येऊ शकतात. अल्प कालावधीत किंमतींवर दबाव कायम राहिल, असे तज्ज्ञांचे मत आहे. खरं तर, डॉलर निर्देशांकातील वाढ आणि कोरोना विषाणूच्या लसीच्या अपेक्षेने सोन्याच्या दरावर फरक पडला आहे. तसेच जागतिक बाजारात घटत्या मागणीमुळे देखील दर कमी होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ञांचे मत आहे की, सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण झाल्यामुळे महिन्यांनंतर पुन्हा एकदा किंमत 50 हजार रुपयांच्या खाली आली आहे. स्पॉट मागणी कमकुवत झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यांचे ठेव व्यवहार कमी केले आहेत. गुरुवारी दिल्ली सर्राफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 485 रुपयांनी घसरून 50,418 रुपयांवर आला. आता पुढच्या एका महिन्यात सोन्याच्या दरावर आणखी दबाव येणार असून तो घसरुन 47000 पर्यंत जाऊ शकतो. पण दर जास्त काळ कमी राहणार नाहीत. 3 महिन्यांतील सोन्याच्या दरांमधली वाढ पाहता सोनं पुन्हा एकदा महाग होऊ शकतं.


भाव का वाढत होते?


विश्लेषकांच्या मते, 8 ऑगस्टच्या दराच्या तुलनेत सोने-चांदीची किंमत दीड महिन्यांत खूपच वर गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातही दर वाढविण्यात आले. जागतिक बाजारपेठेत दर वाढीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे चीन-अमेरिकामधील व्यापार युद्ध आणि जगभरातील आर्थिक आघाडीच्या नकारात्मक बातम्या. पण आता परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत जरा चांगली झाली आहे. डॉलरच्या किंमतीतील मजबुतीमुळे सोन्याच्या किंमतीतील चढ-उतार दिसून येऊ शकतात.


कमोडिटी अँड करन्सी सेगमेंटचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांच्या मते सोन्याचा दर काही काळासाठी कमी होऊ शकतो. दिवाळीच्या आसपास सोन्याच्या किंमती पुन्हा वाढतील. मागणी वाढल्यानंतर सोने पुन्हा 52000 रुपयांच्या जवळपास जाईल. डिसेंबरच्या अखेरीस, सोन्याचे दर  56000 पर्यंत जावू शकते. आता सोन्याचे दर 47000-48000 रुपयांवर येण्याची शक्यता आहे.


तज्ञांच्या मते, विकसित देशांमधील व्याजदर शून्याच्या जवळ पोहोचले आहेत. केंद्रीय बँकांनीही असे सूचित केले आहे की व्याज दर बर्‍याच काळासाठी समान राहतील. सामान्यत: व्याज दराचे सोन्याच्या किंमतीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत, आता अशी अपेक्षा आहे की व्याज दर शून्याच्या जवळ असल्याने बहुतेक लोकं सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्यास पसंती देऊ शकतात. यामुळे किंमती वाढण्याची अपेक्षा आहे.


अमेरिकेतील बेरोजगारीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, ऑगस्टच्या अखेरीस सुमारे 30 दशलक्ष अमेरिकन लोकं बेरोजगारी भत्तेचा लाभ घेत आहेत. यानंतर, फेड रिझर्व्ह आणि अमेरिकन सरकार पुढील प्रोत्साहन पॅकेजेस घोषित करू शकेल अशी आशा देखील वाढली आहे, जेणेकरून अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणता येईल. तज्ञांचे म्हणणे आहे की, केंद्रीय बँका अद्यापही अर्थव्यवस्थेत लिक्विडिटी वाढवतील. जे सोन्याच्या दरावर सकारात्मक प्रभाव पाडतील.