मुंबई : भारतातील वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोवर वायदा सोन्याच्या दरात 0.03 टक्के घसरण पाहायला मिळाली. तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सप्टेंबर वायदाच्या किंमतीत 0.24 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वेळेच्या दरातील चढ-उतारानंतर सोन्याच्या किंमतीत 0.47 टक्के वाढ झाली होती. तर चांदीच्या किंमतीत 0.54 टक्के वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात चार महिन्यांपूर्वीच्या निच्चांक गाठला आहे. हा दर 10 ग्रॅम करता 45,600 रुपये आहे. यानंतप सोन्याच्या दरात वाढ होऊन तो दर 10 ग्रॅम करता 47,000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सोन्याच्या दरात गेल्यावर्षी रेकॉर्डब्रेक वाढ झाली होती. 10 ग्रॅम करता 56,200 रुपये प्रति ग्रॅम पोहोचला होता. 


सोन्या-चांदीचा नवा दर 


MCX वर मंगळवारी ऑक्टोबर वायदा सोन्याचा दर 13 रुपयांनी कमी झाला असून आता 10 ग्रॅम करता 47,212 रुपये आहे. चांदीच्या किंमतीत मात्र वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सप्टेंबरमध्ये चांदीचा दर 153 रुपये वाढ झाली असून 63,610 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.   


सोन्याच्या दरात घसरण 


सोन्याच्या गुंतवणूकदारांनी UBS Group ला चेतावणी दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनानंतर आर्थिक स्थिती बदलत आहे. अमेरिका जॉब मार्केटमार्फत डाटा सर्वाधिक उत्तम आहे. सोमवारी सोन्याच्या दरात थोडी घसरण पाहायला मिळाली आहे. तर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 505 रुपयांनी दर घसरला आहे. सोन्याच्या दरात 42 रूपयांनी घसरण झाली आहे. 45960 रुपयांवर सोन्याचा दर बंद झाला आहे. चांदीच्या दराची 61,469 रुपये प्रति किलोग्रॅमवर नोंद झाली आहे.