Gold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर घसरले आहेत. सोमवारी एकीकडे भारतीय शेअर बाजाराची दमदार सुरुवात झाली तर एकीकडे सोनं-चांदीच्या दरात नरमाई पाहायला मिळत आहे. वायदे बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MCXवर आज 25 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,090 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळं आज 24 कॅरेट प्रतितोळा सोनं 78,550 रुपयांवर पोहोचली आहे. दिवाळीनंतर सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली होती. ऐन लग्नसराईत सोनं महागल्याने ग्राहकांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र, आता या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहक सोनं खरेदी करु शकतात. 


आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1,090 रुपयांची घट झाली असून 78, 550 रुपयांवर पोहोचले आहे. तर, 18 कॅरेट सोन्याच्या दरात 820 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 58,910 रुपयांवर पोहोचली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1000 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 72,000 रुपयांवर पोहोचलं आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  72, 000 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  78, 550 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58, 910 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,200 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,855 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 891 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   57,600 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62,840 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    47,128 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 72, 000 रुपये
24 कॅरेट- 78, 550 रुपये
18 कॅरेट- 58, 910 रुपये