Gold Price Today In Marathi: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा झळाळी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. तर, चांदीने देखील उसळी घेतल्याचे पाहायला मिळतेय. भारतीय वायदे बाजारात चांदी आज 1800 रुपयांनी वाढली आहे. आज चांदी 81,903 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. मागील सत्रात चांदी 80,061 वर स्थिरावली होती. तर, आज सोनं 110 रुपयांनी वाढलं आहे. आज 24 कॅरेट सोनं प्रतितोळा 71,620 रुपये इतके आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुच्या किंमतीत उसळी घेतली आहे. स्थानिक सराफा बाजारातही सोनं वाढलं आहे. सोन्याच्या मागणीत होणारी वाढ आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडी यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं चित्र आहे. आज सोनं 22 कॅरेट सोनं 100 रुपयांनी वाढलं आहे. त्यामुळं प्रतितोळा सोन्याची किंमत 65,650 रुपये इतके आहे. तर, 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याची किंमत 71,620 रुपये इतकी आहे. 


असा आहे सोन्याचे दर


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  65, 650  रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  71, 620 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  53, 720 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 565 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 162 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 372 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   52, 520 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   57, 296 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    42, 976 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-65, 650  रुपये
24 कॅरेट-71, 620 रुपये
18 कॅरेट- 53, 720   रुपये