Gold Rate, 18th July 2023: गेल्या काही वर्षात चलनवाढीमुळे सोन्याचं महत्त्व वाढल्याचं दिसत आहे. गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. सोन्याच्या दरात (Gold Silver Rate) मागील काही दिवसांपासूनच्या वाढीनंतर आता पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ग्राहकांसाठी मोठी सुवर्णसंधी चालून आलीये. एकेकाळी सोने 58 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होते तर गेल्या आठवड्यात सोन्याचे 59 हजार रुपयांपर्यंत उसळी घेतली होती मात्र, आता सोन्याचे भाव (Gold Rate Today) पुन्हा खाली आले आहेत. 


सोनं-चांदीचा आजचा भाव काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज भारतीय बाजारात 22 कॅरेट सोन्यासाठी 5,498 रुपये प्रति ग्रॅम आहे (Gold rate today), तर 24 कॅरेट सोन्याचासाठी म्हणजे ज्याला 999 सोनं म्हणतात. त्याची किंमत 5,998 रुपये प्रति ग्रॅम आहे.


डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला आणि आंतरराष्ट्रीय किमती स्थिर राहिल्यास चांदी (Silver rate today) आणखी महाग होण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात आज चांदीची किंमत 77.70 प्रति ग्रॅम आहे. भारतातील चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय किमतींनुसार ठरवली जातं. त्याशिवाय ते डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या चलन चलनावरही अवलंबून असते. 


तुमच्या शहरात भाव काय?


आज चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 5,998 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर मुंबईत याची किंमत 54, 980 रुपयांवर पोहोचली आहेत. त्याचबरोबर चेन्नईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 60, 390 वर गेल्याचं दिसून येतंय. पुण्यात देखील 22 कॅरेट सोन्याची किंमत 54, 980 रुपयांवर पोहोचली आहे.


आज चेन्नईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 815 रुपये आहे. तर मुंबईमध्ये 10 ग्रॅम चांदीची किंमत 777 रुपये इतकी आहे. तसेच मुंबईप्रमाणे दिल्ली आणि कोलकाताच्या किंमती देखील समान आहे. पुण्यात देखील 10 ग्रॅम चांदीची किंमत 777 रुपये आहे.


आणखी वाचा -Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होणार की नाही? जाणून घ्या नवे दर


दरम्यान, आज भारतातील चांदीच्या किमतीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. यामध्ये मौल्यवान धातूच्या आंतरराष्ट्रीय किमतींचा समावेश आहे. भारतातील चांदीच्या किमती मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडत आहेत याचे संकेत घेतात.