Gold Silver Price Today: आठवड्यातील पहिल्याच दिवशी सोनं आणि चांदीच्या दराने उसळी घेतल्याचे पाहायला मिळते. MCX वर सोनं 235 रुपयांनी उसळी घेतली आहे. 71610 रुपये प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावले आहे. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास 650 रुपयांनी मजबूत झाली आहे. चांदी आज 83865 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये स्पॉट गोल्ड 2500 डॉलर आणि चांदी 29 डॉलरच्यावर व्यवहार करत आहे. ग्लोबल जियो राजकीय संघर्षामुळं क्रूड ऑइलचे भावही 80 डॉलर प्रति बॅरेलवर स्थिरावले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रक्षाबंधनाच्या दिवशी आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,277 रुपये प्रति ग्रॅम इतकी आहे तर, 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,670 रुपये प्रतिग्रॅम इतकी आहे. वायदे बाजारात आज सोन्याला झळाळी आली आहे. सोन्याच्या किंमती वाढत असतानाच सप्टेंबरमध्ये पॉलिसीमध्ये व्याजदरात कपात होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्यपूर्व देशातही तणावाचे वातावरण आहे. त्याचाच परिणाम सोन्याच्या किंमतीवर होत आहे. चांदीदेखील 29 डॉलर प्रति ऑन्सवर व्यवहार करत आहे. गुडरिटर्न्स या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार असे आहेत सोन्याचे भाव


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत


10 ग्रॅम     22 कॅरेट  66, 850  रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  72, 920 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  54, 700 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 685 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 292 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 470 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 480 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58, 336 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43, 760 रुपये