Gold Rate Today : ग्राहकांसाठी मोठी बातमी! आज 24 कॅरेटसाठी सोन्याचे दर येथे चेक करा
Gold Silver Price : गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरु असताना सोन्या-चांदीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ शकता, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
Gold Silver Price on 2 June 2023 : मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) वाढ झाल्यानंतर जूनच्या पहिल्या दिवशी पुन्हा सोन्या-चांदीचे दर कमी झाले आहेत. मात्र, चांदीच्या दरात वाढ कायम आहे. दरम्यान इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, गुरुवारी संध्याकाळी सोन्याचा भाव 60,157 रुपये होतो. तर आज (2 जून 2023) सकाळी 60113 रुपये दर आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात सकाळ ते संध्याकाळ 44 रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. आज 11 ग्रॅम 22 कॅरट सोने 55,850 रुपये तर 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 60, 930 रुपये झाले आहे.
मागील व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा (Gold Rate) भाव 60,390 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला होता. परिणामी मागील दिवसाच्या तुलनेत 233 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घसरणीसह बंद झाला आहे. याशिवाय आज चांदीचा दर 71372 रुपये प्रति किलोवर बंद झाला. आज सकाळी हा दर 71350 रुपये प्रति किलोच्या पातळीवर उघडला. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत चांदीचा दर 22 रुपयांनी वाढला आहे. शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, चांदीचा दर 70,980 रुपये प्रति किलो होता. त्यामुळेच कालच्या तुलनेत आज चांदीचा दर प्रतिकिलो 384 रुपयांनी वाढला आहे.
वाचा: पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठी अपडेट, गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
24, 23, 22 कॅरेटचा दर
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,157 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटची किंमत 59,916 रुपये आणि 22 कॅरेटची किंमत 55,104 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याची किंमत 45,118 रुपये होता.
तुमच्या शहरातील किंमत तपासा
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. तुम्हाला थोड्या वेळात एसएमएसद्वारे दर समजतील. यासोबतच तुम्ही सतत अपडेट्ससाठी IBJA च्या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता.
मेकिंग चार्ज कसा निश्चित करावा?
दागिन्यांची डिझाईन बनवायला जितका वेळ लागतो, तितकाच मेकिंग चार्जेस लागतो. सोने किलोमध्ये येते. त्यानंतर दुकानदार, कारागीर या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन्स तयार करातात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्के मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती हुशारीने डिझाइन केले आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आकारण्यात येते. जितके आकर्षक, लक्षवेधी आणि बारकाईन डिझाइन्स तयार केल्या जातात. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधे डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.