Gold Silver Price Today on 25 May 2023 : सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातूंच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज, 25 मे 2023 रोजी जागतिक ट्रेंडमध्ये सोन्या-चांदीचे दर (Gold Silver Price) भारतीय सराफ बाजारात वाढले आहेत. आज सोन्याच्या दरात 260 रुपयांची वाढ झाली असून गुड्स रिटर्नमधून मिळालेल्या माहितीनुसार 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम 56,250 रुपये मोजावे लागतील. तर 24 कॅरेट सोन्यासाठी 61,360 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीचा भाव 74,050 रुपये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज गुरुपुष्यामृत योग (Gurupushyamrut Yoga) आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 5.52 या मुहूर्तावर सोने (gold rate today) खरेदी करु शकता. अशावेळी तुम्ही कोणत्याही ज्वेलर्सच्या दुकानातून सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. 


मुंबई, पुणे, नागपूरमधील सोन्याचे दर


गुड्स रिटर्नच्या वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची (mumbai gold rate ) किंमत प्रति 10 ग्रॅम 55,800 रुपये आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 60,870 रुपये आहे. त्याचबरोबर पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 55,800 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,870 रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 55,800 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,870 रुपये इतका असेल. त्यामुळे आज म्हणजेच गुरुपुष्यामृत योगनिमित्ताने सोने-चांदीचे दागिने घ्यायचे असतील तर आज ज्वेलर्सच्या दुकानात हा दर राहणार आहे. 


mcx फ्युचर्स मार्केट स्थिती


आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर आज देशांतर्गत वायदा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात घसरण नोंदवण्यात आली. आज एमसीएक्सवर सोन्याचा जून फ्युचर्स 117 रुपयांच्या कमजोरीसह 60,262 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करताना दिसत आहे. त्याचवेळी चांदीचा जुलै वायदा 596 रुपयांच्या कमजोरीसह 72,725 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.


अशी ओळखा सोन्याची शुद्धता 


सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉलमार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरटवार 750 लिहिलेलं असते. 
बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. 24 कॅरेटपेक्षा जास्त सोन्याचा रंग उतरतो. कॅरेट जितके जास्त तितके जास्त शुद्ध सोने असे म्हटले जाते.