10 दिवसांत सोन्याचा दरात 2500 रुपयांनी वाढ, आजचा सोन्या-चांदीचा भाव काय?
![10 दिवसांत सोन्याचा दरात 2500 रुपयांनी वाढ, आजचा सोन्या-चांदीचा भाव काय? 10 दिवसांत सोन्याचा दरात 2500 रुपयांनी वाढ, आजचा सोन्या-चांदीचा भाव काय?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2024/08/05/775559-goldsilverrate.png?itok=xtwC8bRx)
Gold-Silver Price: गेल्या आठवड्यात सोन्याच्या दराने मोठी उडी मारली होती. जागतिक बाजारात सोन्याच्या दराचे रेकॉर्ड अधिक होते. तर देशांतर्गत बाजारातही सोन्याचा दर 70,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. मात्र, आज शेअर बाजारातील घसरणीदरम्यान कमोडिटी मार्केटमध्येही घसरण दिसून आली. आणि दर कमी आला. पण आता सोन्याचा दर काय हे जाणून घ्या?
डॉलरच्या निर्देशांकात थोडी घसरण पाहायला मिळाली यामुळे सोन्याच्या दरात या दिवसात मोठी वाढ झाली आहे. सोन्याने गेल्या आठवड्यात मोठी झेप घेतली होती आणि जागतिक बाजारात किंमत विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचली होती. देशांतर्गत बाजारातही तो पुन्हा 70,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. मात्र, आज शेअर बाजारातील घसरणीदरम्यान कमोडिटी मार्केटमध्येही घसरण दिसून आली. आज एमसीएक्सवर चांदीच्या दरात वाढ झाली होती. परंतु त्यानंतर त्यात मोठी घसरण झाली. त्याच वेळी, ऑगस्ट कॉन्ट्रॅक्टचे सोने देखील वधारले होते.
MCX वर सकाळी 11:30 च्या सुमारास, सोने 173 रुपयांच्या घसरणीसह 70,082 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते. शुक्रवारी ते 70,255 रुपयांवर बंद झाले होते. या काळात चांदी 293 रुपयांनी घसरून 82,200 रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत होती. आज चांदीचा भाव 83,050 रुपयांच्या आसपास उघडला होता, परंतु येथेही घसरण झाली होती.
देशांतर्गत सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली होती. त्यामुळे शुक्रवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याचा भाव सलग चौथ्या दिवशी 350 रुपयांनी वाढून 72,850 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 72,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने सांगितले की, याउलट चांदी 200 रुपयांनी घसरून 86,000 रुपये प्रति किलोवर बंद झाली. त्याची मागील बंद किंमत 86,200 रुपये प्रति किलो होती.
दरम्यान, 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 350 रुपयांनी वाढून 72,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याची मागील बंद किंमत 72,150 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. देशांतर्गत, व्यापाऱ्यांनी सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचे श्रेय अलीकडील सीमा शुल्क कपातीमुळे किरकोळ खरेदीदारांसह ज्वेलर्सकडून मागणी वाढलेली आहे.
प्रति ग्रॅम सोन्याची किंमत
आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,484 प्रति ग्रॅम आहे
24 कॅरेट सोन्याची किंमत ₹7,072 प्रति ग्रॅम आहे.
सोन्याची शुद्धता कशी ओळखावी?
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले आहे. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने शुद्ध असेल.
जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आणि 22 कॅरेट सोने अंदाजे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारखे 9% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने आलिशान असले तरी ते दागिने बनवता येत नाही. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
मिस्ड कॉलवरून किंमत जाणून घ्या
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी, तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील. याशिवाय, सतत अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.