Gold-Silver Price Today : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2023). या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व मानले जाते. आज (22 एप्रिल 2023 ) सकाळी 8:04 ते रविवार, 23 एप्रिल सकाळी 8 वाजेपर्यंत सोने खरेदीसाठी शुभ मुहूर्त आहे. या दिवशी दागिने करुन परिधान केल्यास अकाली मृत्यूचा धोका कमी होतो. म्हणून आजच्या मुहूर्तावर बहुतेकजण सोने खरेदीसाठी बाजारात गर्दी करतात. जर तुम्ही पण आजच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी (Gold-Silver Price) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. कारण आजच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मिळालेले धन कायम तुमच्यासोबत राहत. म्हणून लोक अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya 2023) सोने खरेदी करतात आणि घरी आणतात जेणेकरून त्यांची संपत्ती कायम टिकून राहते. आज (Akshaya Tritiya 2023) 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 59,870 आहे. आठवड्याच्या पाचव्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली असून सराफा बाजारच्या वेबसाइटनुसार चांदी 74,880 रुपये प्रति किलोने विकली जाणार आहे. 


वाचा: लक्ष्मीचा वास होवो, संकटांचा नाश होवो..., अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी पाठवा Messages, Quotes, Images


तर मुंबईत (Mumbai Gold Rate) 22 कॅरेट सोन्याची किंमत 54,881 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,870 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात (Pune Gold Rate) 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 54,881 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,870 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 54,881 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 59,870 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 54,881 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 59,870 रुपये आहे. 


दरम्यान गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर 50,808  रुपये होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या दरात 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावेळी किंमत 60 हजारच्या घरात आहे. 


मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या


22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 


अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या


आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.