नवी दिल्ली : सोनं-चांदीच्या किंमतीत शुक्रवारी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याने, देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी झाले आहेत. शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १९६ रुपयांनी कमी झाला आहे. चांदीच्या किंमतीतही घसरण झाली आहे. एक किलो चांदीचे दर ९५६ रुपयांनी कमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ३८ हजार ७०६ रुपयांवर पोहचला आहे. गुरुवारी सोन्याचा भाव ३८ हजार ९३० रुपये इतका होता. 


तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किंमतीतील घसरण आता थांबू शकते. कारण, 'मूडीज'ने भारताचा आउटलुक कमी केल्यानंतर, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयांत कमी आली आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.


  


रेटिंग एजेन्सी 'मूडीज'ने, भारताचा आउटलुक स्टेबलवरुन निगेटिव्ह केला आहे. यामुळे भारतात परकीय गुंतवणूकीला धक्का बसू शकतो. शेअर बाजारात घसरण होऊ शकते. तर याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवरही होऊ शकतो.