मुंबई : सोन्याचे दरांनी वर्षभरातील निच्चांकी स्थर गाठला आहे. दररोज सोने  - चांदीच्या दरांमध्ये घट होत असताना, आज सोन्याचे दर स्थिर राहिले आहेत. सध्या सोन्याच्या दरांमध्ये झालेल्या घसरणीचा फायदा गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदार घेत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील विविध शहरांमध्ये सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण सुरू होती. मुंबईत आज जवळपास सोन्याचे दर स्थिर आहेत.  तर चांदीच्या दरात प्रतिकिलो 300 रुपयांची वाढ झाली आहे. 


सोन्याचे दर


22 कॅरेट : 43,420 प्रति 10 ग्रॅम
24 कॅरेट : 44,430 प्रति 10 ग्रॅम


चांदीचे दर :


67,000 रुपये प्रतिकिलो


गेल्या काही दिवसांपासून सोने - चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी त्याचा फायदा घेतला आहे.


परंतु ज्या लोकांनी लॉकडाऊनच्या काळात सोन्याचे  जास्त दर असताना खरेदी केली होती. त्यांची धाकधूक वाढली आहे. सोन्याचे दर  आणखी कमी झाले तर, त्यांना मोठा तोटा होऊ शकतो.


त्यामुळे येत्या काही दिवसात सोन्याचे दर वाढतात की, आणखी कमी होतात. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे.