Gold-Silver Price Today: दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मल्टी कमोडिटी एक्सजेंचमध्ये सोन्याचा भाव पुन्हा एकदा 60 हजारांवर गेला आहे. त्याचबरोबर चांदीचा भावदेखील 72,000 रुपयांवर गेला आहे. डॉलरमध्ये आलेली तेजी आणि युएस व्याज दरातील घडामोडींमुळं सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाला आहे. (Check Gold-Silver Price Today)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मस्टी कमोडिटी एक्सजेंचमध्ये सोन्याचा भाव 0.21 टक्क्यांनी वाढला असून 60235 रुपये प्रति ग्रॅम आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही 0.30 टक्क्यांची वाढ झाली असून 72591 रुपये प्रतिकिलोग्राम इतकी झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) नुसार, बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60618 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर, आज सकाळी सोन्याचा दर 60453 इतका होता. 


22 कॅरेट सोन्याचा दर


22 कॅरेट सोन्याचा भाव दिल्लीत 56100 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. त्याचबरोबर चेन्नईमध्ये 56,450 रुपये तर मुंबईत 55,950 रुपये आणि कोलकातामध्ये 55,950 रुपये इतकी आहे. 


IBJA आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज दोन्हीकडून सोन्याचे दर जाहिर करण्यात येतात. हे दर सोन्याच्या शुद्धतेनुसार जारी केले जातात. या किंमतीत टॅक्स आणि मेकिंग चार्ज दिलेले नसतात. या किमतींवर टॅक्स आणि मेकिंग चार्ज लागल्यानंतर बाजारात त्या दरात सोनं मिळते. 


या पद्धतीने चेक करा सोन्याची किंमत


सोन्याचे दर तुम्ही घरबसल्याही चेक करु शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्सच्या मते तुम्ही  8955664433 क्रमांकावर मिस कॉलदेऊनही सोन्याची किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरुन मेसेज करता त्याच नंबरवर तुम्हाला सोन्याच्या रोजच्या दरांबाबत अपडेट येईल.


सोने खरेदीला पसंती


दसऱ्यापासून वाढलेला सोने खरेदीचा उत्साह दिवाळीमध्ये कायम राहिला. नोव्हेंबर महिन्यातील लग्नसराई आणि आंतरराष्ट्रीय भूराजकीय परिस्थितीमुळे भविष्यात सोने महाग होण्याच्या धास्तीने सध्या सोने खरेदीकडे अधिक कल दिसून येत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सोने प्रतितोळा १० हजारांनी महाग झाले असले, तरी ग्राहकांचा उत्साह कमी झालेला नाही. २५ ते ५० टक्क्यांची सूट असल्यामुळे दागिन्यांकडे कल असला तरी, वळी, नाणी आणि बिस्कीटे अशा स्वरूपाचे सोने खरेदी करण्याकडेही कल होता.