Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानंतर `हा` आहे आजचा दर
चांदीच्या दरात मोठी बदल
मुंबई : भारतात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. मात्र आज शुक्रवारी या घसरणीनंतर सोन्याच्या दरात मुसंडी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑगस्टचं सोनं 9 जुलै रोजी 10 ग्रॅम सोन्याचा दर 0.31 टक्के वाढलं आहे. (Gold Silver Price Today July 9 : Should you BUY or SELL under current scenario ) आता सोन्याचा दर 47868 रुपयांवर पोहोचलं आहे.
शुक्रवारी चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सप्टेंबरला चांदीच्या दरात 0.27 टक्के घसरण झाली आहे. सोन्याचा दर 68778 रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शुक्रवारी अमेरिकी ट्रेझरी यील्डमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
एमसीएक्सवर दहा ग्रॅम सोन्याची किंमत गेल्या वर्षी याच कालावधीत सर्वाधिक 56191 रुपयांवर पोहोचली. आज ऑगस्ट फ्युचर्स एमसीएक्सला सोन्याचे दर 10 ग्रॅम 47700 रुपयांच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 8750 रुपयांनी स्वस्त आहेत.
आज 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅमवर 47,970 आणि 100 ग्रॅमवर 4,79,700 वर आहे. जर आपण प्रति 10 ग्रॅम सोन्याचे भाव पाहिले तर 22 कॅरेट सोनं 46,970 वर विकलं जात आहे. जर आपण मोठ्या शहरांतील सोन्याच्या किमतींकडे नजर टाकली तर दिल्लीतील 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,800 आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 50,850 वर आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे 46,970 आणि 24 कॅरेट सोन्याचे 47,930 वर धाव आहे.
अमेरिकन सोन्याचे वायदा भाव 0.1 टक्क्यांनी वाढून ते 1,804.30 डॉलर प्रति औंस झाला. अमेरिकेच्या 10 वर्षाच्या ट्रेझरीचे उत्पादन 19 फेब्रुवारीपासून सर्वात कमी पातळीवर गेले. फेडरल रिझर्व्हच्या जूनच्या बैठकीच्या मिनिटांवरून असे दिसून आले की, अधिकाऱ्यांना वाटले की, आर्थिक पुनर्प्राप्तीवरील त्यांचे भरीव लक्ष्य अद्याप पूर्ण झालेले नाही.