Gold Price Today 7 January 2024: आज सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा नरमाई दिसून आल्याचे चित्र आहे. वायदे बाजारात मंगळवारी सोनं-चांदीच्या दरात थोडे चढ-उतार होताना पाहायला मिळाले. MCX वर सोनं 77,200 रुपयांवर स्थिरावलं होतं. तर, चांदी 90,500 रुपयांवर ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं $2,650 रुपयांवर व्यवहार करत होतं. बॉन्ड यील्डमध्ये मजबूती आल्यानंतर एका आठवड्यातच उच्चांक गाठला होता. मंगळवारी रुपया 85.67/$ वर पोहोचला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सोनं-चांदीच्या व्यवहाराबाबत बोलायचे झाल्यास MCXवर आज सकाळी सोनं 20 रुपयांनी वाढून 77,178 रुपये प्रतितोळावर स्थिरावले आहे. तर काल सोमवारी सोनं 77,158 रुपयांवर स्थिरावले होते. यादरम्यान चांदी 29 रुपयांनी घसरून 90,525 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर व्यवहार करत आहे. काल चांदी 90,554 रुपयांवर स्थिरावली होती. 


सराफा बाजारात सोमवारी सोन्याची किंमत 700 रुपयांनी कमी होऊन 79,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावली होती. शुक्रवारी सोन्याची किंमत 79,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार बंद झाला होता. सोमवारी चांदीचे दर देखील 300 रुपयांनी वाढून 90,700 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावले होते. मागील सत्रात चांदी 90,400 रुपयांवर स्थिरावली होती. 


99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याची किंमत शुक्रवारी 79,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्या तुलनेत 700 रुपयांनी घट होऊन 78,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर सोनं स्थिरावलं आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  72, 150 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  78, 710 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  59,030 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,215 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,871 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 903 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   57,720रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62,968 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    47,224 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 72, 150 रुपये 
24 कॅरेट-  78, 710 रुपये
18 कॅरेट-  59,030 रुपये