Gold Price Today : सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का ! सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन दर
सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का बसणारी बातमी आहे. कारण गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. गुरुवारीही सोने चांदीच्या दरात तेजी होती. आजही तेजी कायम असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर स्थिर आहे. (gold silver price update 7 october 2022 sc)
Today Gold Silver Rate : सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना धक्का बसणारी बातमी आहे. कारण गेल्या आठवड्याभरापासून सोने चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोने चांदीच्या दरात लक्षणीय वाढ दिसून आली. गुरुवारीही सोने चांदीच्या दरात तेजी होती. आजही तेजी कायम असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीचे दर स्थिर आहे. (gold silver price update 7 october 2022 sc)
आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,410 रुपये तर 24 कॅरेट साठी 52,810 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 665 रुपये आहे. (gold silver price update 7 october 2022)
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई - 52,810 रुपये
दिल्ली - 52,370 रुपये
हैदराबाद - 52,210 रुपये
कोलकत्ता - 52,210 रुपये
लखनऊ - 52,370 रुपये
मुंबई - 52,210 रुपये
नागपूर - 52,240 रुपये
पुणे - 52,240 रुपये
गेल्या पाच व्यवहारातील तेजीनंतर येत्या काही दिवसांत सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोन्याची कमी आयात याशिवाय चीन आणि तुर्कस्तान हे त्याचे प्रमुख कारण आहे. मात्र, किंमती वाढल्याने सणासुदीच्या काळात सोन्याच्या खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
खरं तर, ICBC स्टँडर्ड बँक, जेपी मॉर्गन आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक भारतात बहुतेक सोन्याचा पुरवठा करतात. सणासुदीच्या काळात जास्त सोने खरेदीची मागणी असते. मात्र, कमी प्रीमियममुळे या बँका भारताच्या सोन्याच्या पुरवठ्यात कपात करत आहेत. ते चीन आणि तुर्कस्तानला जास्त किंमत देऊन सोने विकत आहेत. अशा स्थितीत सणासुदीच्या काळात देशात सोन्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव वाढू शकतात. केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, पुरवठ्यात कपात आणि आयातीतील घट यामुळे दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव सध्या 52,000 वरून 53,000 पर्यंत वाढू शकतात.
वाचा : पेट्रोल भरण्याआधी तुमच्या शहरातील Petrol-Diesel चे दर वधारले की, घसरले? झटपट चेक करा
आयात 30 टक्क्यांनी घटली
सप्टेंबरमध्ये भारतातील सोन्याच्या आयातीत 30% घट झाली आहे. याउलट, तुर्कीमधील आयात 543 टक्क्यांनी आणि चीनमध्ये 40 टक्क्यांनी वाढली. केडिया म्हणाले, ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीत सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात होते. गेल्या वर्षी याच तिमाहीत सुमारे 1,000 टन सोने आयात करण्यात आले होते, परंतु यावेळी ही आयात कमी झाली आहे.
बँकांकडे 10% कमी राखीव रक्कम आहे
सूत्रांचे म्हणणे आहे की भारतातील बहुतेक सोन्याचा पुरवठा बँकांकडे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत यावेळी 10 टक्के कमी साठा आहे. मुंबईतील एका व्यापाऱ्याने सांगितले की, यावेळी अनेक टन सोन्याचा साठा गरजेचा होता, परंतु तो केवळ काही किलोमध्येच आहे.