मुंबई : डॉलरच्या तुलने रुपयांमध्ये आज घसरण झाली आहे. या दरम्यान सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळत आहे. MCX वर सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी ऑक्टोबरमध्ये डिलिव्हरी झालेल्या सोन्याची किंमतीत 132 रुपयांनी वाढ झाली आहे. आजचा सोन्याचा दर 46495 रुपये आहे. यावेळी डिसेंबरच्या सोन्याच्या दरात 102 रुपये वाढ झाली आहे. 46677 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याचा दर ट्रेंड होत आहे. सोन्याचा दर इंटरनॅशन स्तरावर सकाळी 11 वाजून 15 वाजता 6.30 डॉलर म्हणजे 1758.10 डॉलर ट्रेड होत आहे. यावेळी चांदी 0.142 डॉलरमध्ये वाढ पाहायला मिळाली. 23.258 डॉलर प्रती ट्रेड होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सुरूवातीला तीन पैशांची घसरण पाहायला मिळाली. हा दर 74.28 प्रति डॉलरवर आलं आहे.  


MCX वर चांदीचा दर 


चांदीबद्दल बोलायचं झालं तर MCX वर या वेळी चांदी 327 रुपयाची,डिसेंबर डिलिवरीची चांदी 287 रुपयांची तेजी सह 62895 रुपया प्रति किलोग्राम पातळीवर ट्रेड करत आहे, मार्च 2022 डिलिवरी चांदी 600 रुपयाची साथ आहे 63956 रुपयाची पातळी ट्रेड करत आहे. 


गुरूवारी सोन्या-चांदीचा दर 


गुरूवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 422 रुपये आणि चांदी 113 रुपयांनी वाढ झाली आहे. या तेजीनंतर सोन्याचा दर 45138 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 61201 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे. 


सोनं 9820 रुपयांनी स्वस्त 


गेल्या वर्षी, कोरोना संकटामुळे लोकांनी सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती, ऑगस्ट 2020 मध्ये, एमसीएक्सवरील 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56191 रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचली. आता MCX वर सोने ऑक्टोबर वायदा 46,380 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 9820 रुपयांनी स्वस्त होत आहे.