Gold Silver Rate : सोनं-चांदी खरेदी करण्याची सुवर्णसंधी, किंमतीमध्ये मोठी घट
सराफ बाजारात सोनं खरेदीसाठी लोकांची गर्दी, दिवाळीपूर्वी पुन्हा सोनं महागण्याची शक्यता
मुंबई: या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात बदल होत असताना दिसत आहेत. दोन दिवसांत सोन्याच्या दरामध्ये घट झाली आहे. त्यामुळे सराफ बाजारात सोनं खरेदीसाठी लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. दिवळीत सोनं महाग होणार असं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे लोक आता सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याकडे वळत आहे. शनिवारी 22 कॅरेट सोन्याची किंमत 43,350 झाली आहे.
चांदीचे दर 59,900 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले आहेत. दिल्लीच्या सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचे दर 43,350 तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे दर 45,240 रुपये आहेत. कोलकाता इथे 22 कॅरेट सोन्याचे दर 45,900 रुपये आहेत. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचे दर 46,530 रुपये 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार आहेत.
दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीची किंमत 59,900 रुपये 1 किलो आहे. तर मुंबई सराफा बाजारात 1 किलो चांदीसाठी 59,900 रुपये मोजावे लागणार आहे. दुसरीकडे, कोलकाता सराफा बाजारात चांदीची किंमत देखील 59,900 रुपये प्रति किलो आहे. तर चेन्नई सराफा बाजारात चांदीची किंमत 64,100 रुपये किलोमागे मोजावे लागणार आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्यासाठी 47,750 रुपये 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार आहे.
शुक्रवारी इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन 24 कॅरेट सोनं 438 रुपयांनी स्वस्त झालं होतं. तर चांदीचे 113 रुपयांनी स्वस्त झाले होते. 14 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने आता नागरिकांचा पुन्हा एकदा सोनं खरेदीसाठीचा उत्साह वाढला आहे. कोरोनामुळे सोन्याचे दर गेल्यावर्षी वाढलं होतं. सोन्याचे दर गेल्या वर्षी 56 हजारापर्यंत पोहोचले होते. आता पुन्हा एकदा घसरण झाल्याने लोक सोनं खरेदीकडे वळताना दिसत आहेत.