Gold Silver Rate Today | सोन्याच्या दरांत आज घसरण; गुंतवणूकीसाठी खरेदीत वाढ
सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. . सध्याच्या घसरणीचा लग्नसराई असलेल्या कुटूंबांना फायदा होत आहे.
मुंबई : सोने - चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोने-चांदीचे आजचे दर जाहीर झाले आहेत. चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कॉमोडिटी एक्सचेंजवर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 47,965 रुपये आहे. सध्याच्या घसरणीचा लग्नसराई असलेल्या कुटूंबांना फायदा होत आहे.
एमसीएक्सवर दुपारी 2 वाजता चांदीचे दर 61307 रुपये प्रति किलो इतके होते. गेल्या काही दिवसांपूर्वी चांदीचे दर 63 हजाराच्या पार गेली होती. ऑक्टोबर 2020 च्या तुलनेत सोने 4 ते 5 हजार रुपयांपर्यंत स्वस्त आहे.
MCX
सोने 47965 रुपये प्रति तोळे
चांदी 61307 रुपये प्रति किलो
मुंबईतील सोन्याचे दर
6 डिसेंबर : 46,510 रुपये प्रति तोळे
5 डिसेंबर : 47,510 रुपये प्रति तोळे
4 डिसेंबर : 47,500 रुपये प्रति तोळे
मुंबईतील चांदीचे दर
6 डिसेंबर : 61500 रुपये प्रति किलो
5 डिसेंबर : 61600 रुपये प्रति किलो
4 डिसेंबर : 61600 रुपये प्रति किलो
मिस्ड कॉल देऊन सोन्याचा दर जाणून घ्या
तुम्ही घरबसल्या सहज सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.