Gold Silver Rate: लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. आपल्या ओळखीत अनेकांची येत्या काही दिवसात लग्न असतील. सणासुदीनंतर लग्नसराईत सोने-चांदी खरेदीवर भर दिला जातो. अशावेळी तुम्हाला सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 4 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,728 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर चांदी 76,400 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाली. जर तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर याबद्दलची नवीन अपडेट जाणून घ्या. 
 
सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर जवळपास रोजच वाढले आहेत. मात्र, सोमवारी सराफा बाजार बंद राहिला. दरम्यान गेल्या आठवड्यात अवघ्या 4 दिवसांत सोन्याचे दर झपाट्याने वाढले आहेत. या काळात चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. याशिवाय गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीनेही आपला सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. त्यामुळे सध्या तुम्ही सोने चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला खिसा रिकामा करावा लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2024 मध्येही सोन्याचे दर वाढत्या गतीत दिसू शकतात. सोन्याने गेल्या काही महिन्यांत खूप चांगला परतावा दिला असल्याचे मत  केडिया अॅडव्हायझरीचे अध्यक्ष अजय केडिया यांनी व्यक्त केले.  सोन्याचा दर पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये 68 हजार रुपयांवरून 72 हजार रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, असे ते सांगतात.


गेल्या आठवड्यात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 62 हजार728 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. तर मंगळवारी सोन्याचा दर 6 हजार1913 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. अशाप्रकारे, संपूर्ण आठवडाभरात सोन्याचा दर सुमारे 815 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह बंद झाला.


बॅंक बाझार डॉट कॉमनुसार, आज म्हणजेच सोमवार, 4 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये सोन्या-चांदीच्या किमतीत स्थिरता दिसली आहे. भोपाळमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 59 हजार 330 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 62 हजार 300 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.