Gold Price Today | सोनं चमकलं, चांदीलाही झळाळी, पाहा किती रुपयांनी वाढ झाली?
Gold Price Today | पाहा सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव किती
मुंबई : आठवडयाच्या पहिल्या दिवशी सराफा बाजारात तेजी पाहायला मिळाली. रुपया घसरल्याने आणि आंतराराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात उसळीमुळे राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात (Gold Price Today) वाढ झाली आहे. सोन्याच्या प्रति 10 ग्रॅममागे जवळपास 500 रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या प्रती 10 ग्रॅममागे 478 रुपयांनी वाढ झाल्याने आजचा दर हा 49 हजार 519 इतका आहे. सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव हा गेल्या कारोबारी सत्रात 49 हजार 41 रुपये इतका होता. (gold silver rate today valentine day 14 february 2022 see per 10 gram gold rate)
चांदीलाही झळाळी
सोन्यासह चांदीही चमकली आहे. सोमवारी चांदीच्या दरात 932 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे एक किलो चांदीचा दर हा 63 हजार 827 रुपये इतका झाला आहे. चांदीचा गेल्या कारोबारी सत्रातील दर हा 62 हजार 895 रुपये इतका होता.
रुपयाही घसरला
दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरला आहे. रुपया 23 पैशांनी घसरुन 75.59 वर पोहचला आहे.