Gold Silver Price Today | सोने - चांदीचे दर तब्बल इतक्या रुपयांनी घसरले; 3 महिन्यांतील निच्चांकी दर
आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरांमध्ये तब्बल 2 टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली आहे
मुंबई : सोने-चांदीच्या भावात जबरजस्त घसरण झाली आहे. सलग काही दिवसांपासून सोन्याच्या दरांवर दबाव दिसून येत होता. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरांमध्ये तब्बल 2 टक्क्यांनी घसरण नोंदवण्यात आली आहे.
MCXवर संपूर्ण आठवडा सोन्याच्या दरांवर दबाव होता. 5 ऑगस्ट रोजी किरकोळ वाढ वगळता सोन्याची वाटचाल घसणीचे संकेत देत होती. आज तब्बल 1000 रुपये प्रति तोळ्याने सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. सोन्यासोबतच चांदीच्या किंमतींमध्येही 2000 रुपये प्रति किलो घसरण झाली आहे.
MCX चे दर
सोने 46651 रुपये प्रति तोळे ( -952)
चांदी 64975 प्रति किलो
मुंबईतील दर
सोने (24 कॅरेट) 46 हजार 700 रुपये प्रतितोळे (-1000)
चांदी 65 हजार रुपये प्रति किलो (-1600)
महाग होईल सोने-चांदी
तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या दिवसांमध्ये सोने-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. सोन्याच्या किंमती येत्या 3 ते 5 वर्षात दुप्पट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किंमतींनी 55 हजारांचा टप्पा पार केला होता. त्या तुलनेत सोने सद्या स्वस्त मिळत आहे. यावर्षी देखील सोन्याच्या किंमती 55 हजाराचा टप्पा पार करतील अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.