नवी दिल्ली :  दिल्ली (Delhi) सराफा बाजारात गुरुवारचे सोन्याचे दर जाहीर (Gold Price Today) करण्यात आले आहेत. सोनं आज ऑल टाईम हाय रेटपेक्षा फार कमी दरात मिळतंय. जर तुम्हीही सोनं खरेदी करण्याच्या तयारीत असाल, तर सोनं खरेदी (Gold Shopping) करण्यासाठी हीच सुवर्णसंधी आहे. (gold silver today price in delhi city know price of 22 and 24 karat rates)


24 कॅरेटचा आज भाव किती?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढण्यासह दिल्ली सराफा बाजारातही सोन्याच्या किंमतीत वेग पहायला मिळाला. गुरुवारी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत 135 रुपयांनी वाढ झाली. सुधारित दरांनुसार 10 ग्रॅम सोन्याचे दर हे 51 हजार 898 रुपये इतके आहेत. मागील व्यवहारात सोन्याच्या 10 ग्रॅमचा दर हा 51 हजार 763 रुपये इतका होता.


चांदीचे दर किती? 


गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ पहायला मिळाली. चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. चांदीच्या दरात 250 रुपयांनी घट झाली आहे. चांदीचा 1 किलोचा भाव हा 61 हजार 618 रुपये इतका आहे.


मुंबईत आज सोन्याचं दर किती?


10 ग्रॅम 24 कॅरेट सोनं :  51 हजार 720 रुपये


10 ग्रॅम 22 कॅरेट सोनं : 47 हजार 410 रुपये