Gold Price Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घट पाहायला मिळत असली तरी मात्र दोन दिवसांपासून (Gold Price in Mumbai) सोन्याच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळते आहे. परंतु यादरम्यान आता सोन्याच्या भावात पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळते आहे. आज शुद्ध सोन्याचे (Pure Gold Price) दर हे 61,800 रूपये प्रतितोळा असून 22 कॅरेट सोन्याचे दर हे 56,650 रूपये प्रतितोळा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळते आहे. तर चांदी हे लागोपाठ घसरताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे सध्या सोन्याच्यापेक्षा जास्त महाग असलं तरी सोन्याच्या किमती लक्षवेधी वाढ होत असताना चांदीच्या किमती मात्र घसरताना दिसत आहेत. 10 ग्रॅम सोन्याचे भाव आज उतरले आहेत. तेव्हा तुम्हाला सोनं खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. चांदीच्या दरानं 70 हजाराच्या पार आकाडा गाठला आहे. आज चांदीचे दर हे 1 किलोमागे 74,800 रूपये इतके आहे. काल चांदी 200 रूपयांनी घटले आहे. (gold sliver price today check the latest price after hike in last 2 days)


किती आहेत आजचे दर? 


आज शुद्ध सोन्याच्या दरात वाढ आणि घट नाही. गुडरिटर्न्सच्या वेबसाईटनुसार, 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1 ग्रॅम सोनं हे 5,665 रूपये आहे तर 45,320 रूपये प्रति 8 ग्रॅम, 56,650 रूपये प्रति 10 ग्रॅम आणि 5,66,500 रूपये प्रति 100 ग्रॅम असे दर आहेत. तर शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट सोनं आज 6,180 रूपये प्रति 1 ग्रॅम, 49,440 रूपये प्रति 8 ग्रॅम, 61,800 रूपये 10 ग्रॅम आणि 6,18,000 रूपये 100 ग्रॅम इतके आहे. त्यामुळे आज सोन्याचे दर हे कालच्या एवढेच आहेत. परंतु यंदा सोन्याच्या दरात चढउतार लागोपाठ होताना दिसते आहे त्यामुळे आता येत्या काही दिवसात सोन्याचे दर किती हे पाहणं म्हत्त्वाचे ठरणार आहे. 


हेही वाचा - Priyanka Chopra ला फॅनकडून धक्काबुक्की; तरीही संयमानं केलं असं काही की... Video Viral


जाणून घ्या तुमच्या शहरातील दर


नाशिकमध्ये आज 10 ग्रॅम शुद्ध सोनं हे 61,183 रूपये आहे. तर पुण्यात 61,800 रूपये प्रति 10 ग्रॅम शुद्ध सोनं आहे. वसई विरारला हीच किंमत 61,830 रूपये इतकी आहे. नागपूरमध्ये 61,800 रूपये प्रति 10 ग्रॅम शुद्ध सोनं आहे. तेव्हा आज सोनं आणि चांदी खरेदीसाठी ग्राहकांकडे चांगली संधी निर्माण झाली आहे.