सोने-चांदीच्या दरात साधारण वाढ
दिल्लीच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालीये. जागतिक स्तरावर मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात ३० रुपयांची वाढ झाली.
नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झालीये. जागतिक स्तरावर मिळालेल्या सकारात्मक संकेतामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात ३० रुपयांची वाढ झाली.
सोन्याच्या दरात साधारण वाढ
३० रुपयांच्या वाढीसह सोन्याचे दर प्रतितोळा ३० हजार ६५० रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे चांदीच्या दरात १२० रुपयांची वाढ होत ते ३९,८००वर पोहोचले.
तज्ञांच्या मते डॉलरच्या किंमतीत घसरण झाल्याने तसेच कच्च्या तेलावरील दबाव राहिल्याने सोन्या-चांदीच्या दरात तेजी पाहायला मिळाली.
राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर ३० रुपयांच्या तेजीसह अनुक्रमे ३०,६५० रुपये आणि ३० हजार ५०० रुपये प्रति तोळावर पोहोचले.
गेल्या सत्रात सोन्याच्या किंमतीत १४५ रुपयांची वाढ पाहायला मिळाली. चांदीच्या दरात १२० रुपयांच्या तेजीसह ३९,८०० रुपये प्रति किलोवर पोहोचले.