SBI Recruitement 2022: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. देशभरातील 1422 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. त्यापैकी सर्वाधिक रिक्त पदे ही ईशान्य क्षेत्रात 300 जागा रिक्त आहेत. तर जयपूर आणि महाराष्ट्रात 200 जागांसाठी अर्ज मागवले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदासाठी भरती होणार आहे. 07 नोव्हेंबर 2022 पर्यंत sbi.co.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा आहेत. उमेदवारांना 04 डिसेंबर 2022 रोजी ऑनलाइन चाचणीसाठी बोलावले जाईल. या परीक्षा भारतातील अनेक केंद्रांवर घेतल्या जातील.अर्ज करण्यापूर्वी पात्रता, पगार, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर गोष्टींसारखे तपशील तपासून घ्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Educational Qualification


नोकरीसाठी अर्ज करण्याऱ्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता पूर्ण केलेली असावी. यामध्ये इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (IDD) समावेश आहे. उमेदवाराचे वय किमान 21 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे ठेवण्यात आली आहे. सामान्य, EWS, OBC श्रेणीतील उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, SC ST आणि PWD श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.


Government Job: इंडियन पोस्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना 81,100 रुपये पगार


SBI CBO Selection Process


ऑनलाइन परीक्षेत 120 गुणांसाठी ऑब्जेक्टिव टेस्ट आणि 50 गुणांसाठी डिस्क्रिप्टिव टेस्टचा समावेश आहे. ऑनलाइन परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांचे ऑनलाइन अर्ज आणि कागदपत्रे स्क्रीनिंग समितीसमोर ठेवली जातील. मुलाखत 50 गुणांसाठी असेल.