1989 Restaurant Bill: 21व्या शतकात महागाईने (Inflation) सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे. पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या किंमतीने तर सामान्य माणसाचं बजेटचं बिघडलंय. मद्याच्या किंमतीत बेसुमार वाढ झाली आहे. मग जरा विचार की अवघ्या 33 रुपयांना बिअर (Beer) मिळत असेल तर. लोकांचा तर दुकानाबाहेर रांगच लागतील. सध्याच्या काळात असा विचार करता येणार नाही. पण तीस वर्षांपूर्वी हे शक्य होतं. लोकं हॉटेलमध्ये खाण्या-पिण्यासाठी जात होते, आणि केवळ 100 रुपयांपेक्षाही कमी खर्च करत होते. 2 रुपयांना मसाला डोसा, 20 रुपयांना चविष्ट दाल-मखनी अगदी सहज मिळत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉटेलचं जुन बिल होतंय व्हायरल
निबेदिता चक्रवर्ती (Nibedita Chakraborty) नावाच्या एका युजरने फेसबुकवर (Facebook) एक जुन्या बिलाचा फोटो शेअर केला आहे. निबेदिता आणि त्यांचे पती या ठिकाणी जेवणासाठी गेले होते. ही बिलं 1989 सालची असून क्वॉलिटी रेस्टॉरंट आणि अल्का हॉटेलची आहेत. बिलाच्या नीट नजर टाकली तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. निबेदिता आणि त्यांच्या पतीने क्वॉलिटी रेस्टोरंटमध्ये जेवण केलं त्यांचं बिल होतं अवघं 196 रुपये. यात दाल-मखनीची किंमत आहे फक्त 18 रुपये. तर चिकन दो प्याजाच्या एका प्लेटची किंमत आहे 38 रुपये. त्यावेळी एक वाटी रायता केवळ 28 रुपयांना मिळत होता. 


दोन आकडी किंमतीत बिअर
आताचा काळात या किंमतीत पोटभर जेवण शक्य होणार नाही. पाण्याची एक बाटली विकत घ्यायची म्हटली तर 40 रुपये चुकते करावे लागतात. मोठ-मोठ्या कॅफे आणि रेस्टोरंटमध्ये स्टाटर्सही 200 रुपयांहून अधिक किंमतीला मिळतात. इतकंच नाही दुसऱ्या एका बिलावर एक बाटली बिअरची किंमत आहे. त्यावेळी म्हणजे 1989 ला बिअर केवळ 33 रुपयांना मिळत होती. 2023 मध्ये सर्वात स्वस्त बिअरची किंमत 120 रुपये इतकी आहे. म्हणजे गेल्या तीस वर्षात सर्वच किंमतीत तीपटीने वाढ झाली आहे. 


सोन्याचं जुनं बिल झालं होतं व्हायरल
काही दिवसांपूर्वी सोन्याच्या दागिन्यांची एक जुनी पावती सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral News) झाली होती. ज्यामध्ये 10 ग्रॅम सोनं केवळ 113 रुपयाला मिळत होतं. हे बिल 1959 सालमधील आहे, म्हणजे साधारण 64 वर्षे जुने हे बिल आहे. एवढ्या कमी किंमतीत सोनं,मिळत होतं, हे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. पण एकेकाळी सोन्यांचे दर हे फार कमी होते. आज तर या किंमतीत ब्रँडेड चॉकलेटही मिळणार नाही. हे बिल महाराष्ट्रातील वामन निंबाजी अष्टेकर (Vaman Nimbaji Ashtekar from Maharashtra) नावाच्या दुकानाचं होतं