मुंबई : भारतीय वायु सेनेत (Indian Air Force) ऑफिसर होण्याची तुमची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते. यासाठी IAFतर्फे एयर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टच्या (AFCAT-2) माध्यमातून कमिशन अधिकाऱ्यांच्या पदावर भर्तीसाठी अर्ज करण्यास सांगितलं आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय वायुसेनेच्या अधिकृत संकेतस्थळावर careerindianairforce.cdac.in या afcat.cdac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी 01 जून 2021 ते 30 जून 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्यतिरिक्त https://afcat.cdac.in/AFCAT/ या लिंकवर क्लिक करूनही उमेदवार थेट या पदांसाठी अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे उमेदवार http://davp.nic.in/WriteReadData/ADS/eng उमेदवार या लिंकद्वारे थेट अधिकृत अधिसूचना देखील तपासू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत AFCAT प्रवेश, एनसीसी विशेष प्रवेश आणि मेट्रोलॉजी अंतर्गत एकूण 334 रिक्त जागा भरल्या जातील.


Indian Air Force Recruitment 2021 साठी पात्रता निकष


फ्लाइंग ब्रांच


उमेदवारांनी 10+2 पातळीवर गणित आणि भौतिकशास्त्रात किमान 50% गुण आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाकडून किमान 60 टक्क्यांसोबत कोणत्याही विषयात तीन वर्ष पदवी अभ्यासक्रमातून उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% सोबत बीई / बीटेक पदवी (चार वर्षाचा कोर्स) असणं महत्त्वाचं आहे.


ग्राउंड ड्यूटी (तकनीकी) ब्रांच


एरोनॉटिकल इंजीनियरिंग (इलेक्ट्रॉनिक्स) {एई (एल)} – 10+2 स्तरावरील भौतिकशास्त्र आणि गणितामध्ये प्रत्येकी किमान 50% गुण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी / तंत्रज्ञानात किमान चार वर्ष पदवी असलेले Graduate / Integrated असले पाहिजे.


ग्राउंड ड्यूटी


किमान 60% गुण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवीसह उमेदवार बारावी असणं आवश्यक आहे.


Indian Air Force Recruitment 2021साठी वय मर्यादा


उमेदवारांची वयोमर्यादा 25 वर्षांपेक्षा कमी असावी.


Indian Air Force Recruitment 2021साठी पगार


उमेदवारांना रु. 56100 - 177500 दिले जातील