Gold Price Today | वर्षभरातील सोन्याची विक्रमी घसरण, सराफा बाजारात तुंबड गर्दी
सोन्याच्या कमी झालेल्या किंमती गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदारांना आकर्षित करीत आहे
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांमध्ये घसरण सुरूच आहे. कोरोना काळात सोन्याच्या दरातमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परंतु आता सोन्याच्या कमी झालेल्या किंमती गुंतवणूकदार आणि किरकोळ खरेदीदारांना आकर्षित करीत आहे. सोन्याचे दर उतरल्याने सराफा बाजारात गर्दी दिसून येत आहे.
सोन्याच्या दरांनी सध्या गेल्या वर्षभरातील सर्वात कमी दर नोंदवला आहे. सोन्यात गुंतवणूक करण्याची सध्या सुवर्ण संधी चालून आली आहे. कोरोना काळात आयात निर्यातीत अडथळा येत असल्याने भारतीय बाजारात सोन्याचा पुरवठा कमी होत होता. त्यामुळे सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. परंतु त्यानंतर सोन्याच्या दरात सध्या सुरू असलेली घसरण सोने खरेदीदारांसाठी दिलासा देणारी आहे.
कोरोना काळात सोन्याचे दर वाढलेले असताना, ज्यांनी सोने खरेदी केले होते. त्यांना सध्या तोटा झालेला वाटत असेल. परंतु तज्ज्ञांच्या मते, ही घसरण काहीच दिवस असू शकते. दीर्घकालीन गुंतवणूक ठेवल्यास त्याचा नक्की फायदा होऊ शकतो.
आज ( 5 मार्च ) रोजी मुंबईत सोन्याचे दर
22 कॅरेट सोन्याची किंमत - 43 हजार 890 रुपये प्रतितोळा
24 कॅरेट सोन्याची किंमत - 44 हजार 890 रुपये प्रतितोळा
कोरोनाकाळात ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 55 हजार प्रतितोळ्याच्या पुढे गेले होते. त्यामुळे आता सोन्याच्या कमी झालेल्या दराचा फायदा करून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.