Good News : आजपासून नाही होणार Salary Cut; पगाराची पूर्ण रक्कम येणार हाती, पाहा कसं
पगार खात्यात जमा झाल्याचा मेसेज येतो तेव्हा लगेचच पगाराचा आकडा नेमका कितीये हे जाणून घेण्याचीच घाई होते
Salary News : महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवशी, पहिल्या दिवशी किंवा मग पहिल्याच आठवड्यात जेव्हा पगार (Salary) खात्यात जमा झाल्याचा मेसेज येतो तेव्हा लगेचच पगाराचा आकडा नेमका कितीये हे जाणून घेण्याचीच घाई होते. मेडिक्लेम, एक ना अनेक (Policy, PF, Mediclaim) पॉलिसी, पीएफ या साऱ्यातून पैसे कापल्यानंतर आपल्या खात्यात आलेला पगाराचा आकडा पाहण्याची उत्सुकता नोकरी (Job news) करणाऱ्या प्रत्येकालाच असते.
अनेकदा Deductions इतके असतात, की असं का झालं, पगार कमी का आला हेच प्रश्न आपल्याला सतावू लागतात. पण, किमान Air India च्या कर्मचाऱ्यांना आता याची चिंता करण्याची गरज नाही. 1 सप्टेंबरपासून एअर इंडियाकडून कर्मचाऱ्यांचा पगार पूर्व कोविड काळाच्या स्तरावर देण्यात येणार आहे. (Good news Air India employees no salary cut from this month)
कंपनीनं काय सांगितलं?
(Covid ) कोविड काळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची पगार कपात 1 सप्टेंबरपासून थांबवण्यात येणार आहे. यामुळं महामारीच्या आधी असणारं वेतन आता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
अद्यापही एअरलाईनला (Airline) मोठा नफा मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न करायचे आहेत. कोविड काळात (Corona) एअरलाईनचा संपूर्ण व्यवहार आणि खर्च रोखण्यासाठी पगार कपातीचा निर्णय घेण्यात आला होता. पण, आता मात्र पगार कपातीची भीती न बाळगता कर्मचाऱ्यांना (Employees) त्यांचं मूळ वेतन मिळणार आहे.