मान्सून केरळ, तामिळनाडूत दाखल ; मुंबईत ६ जूनला आगमन
आज मान्सून केरळात दाखल झाल्याची घोषणा काही वेळापूर्वीच करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : आज मान्सून केरळात दाखल झाल्याची घोषणा काही वेळापूर्वीच करण्यात आली आहे. अरबी समुद्रातआणि पश्चिम बंगालच्या उपसागरात मान्सूनचे ढग तयार झाले आहेत. त्यामुळे मान्सून आज केरळात दाखल झाला आहे. तीन दिवस आधीच मान्सूनचा पाऊस सुरू झालाय. हा मान्सून दोन ते तीन दिवसात कोकणात दाखल होईल. तर मुंबईत मान्सून ६ जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आलाय.
दक्षिण भागात दाखल झाला असून अरबी समुद्राच्या अन्य भागात दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं होतं. केरळ आणि कर्नाटक किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्याचा फायदा होणार आहे. दरम्यान, मान्सूनने शेतीसाठी चांगली बातमी दिलेय. हा पाऊस शेतीसाठी चांगला असेल. पावसात सातत्य दिसून येईल, असे हवामान विभागाने म्हटलेय.