मद्यपान करणाऱ्यांसाठी चांगली बातमी, तुम्ही गोव्याला गेलात तर `या` ठिकाणी भेट द्यायाला विसरू नका
कंडोलिम बीचच्या छोट्या गावातील `ऑल अबाउट अल्कोहल` (All About Alcohol) संग्रहालयात शेकडो फेनीचे प्रकार आणि बाटलीची कलाकृती आहेत.
पणजी : तुम्ही आतपर्यंत अनेक संग्रहालय पाहिले असतील जे खुप सुंदर आणि अस्मरणीय असेल. परंतु तुम्ही कधी दारुचं संग्रहालय पाहिलं आहे? भारतात पहिल्यांदा आणि तेही महाराष्ट्राच्या अगदी जवळ आता तुम्हाला दुरुचं संग्रहालय पाहायला मिळणार आहे. जेथे तुम्हाला दारुच्या वेगवेगळ्या प्रकारच्या बाटल्या, गोव्य़ाची फेणी पाहायला मिळणार आहे. याची सुरुवात स्थानिक व्यापारी आणि पुरातन वस्तूंचे संकलक नंदन कुडचडकर यांनी केली आहे.
कंडोलिम बीचच्या छोट्या गावातील 'ऑल अबाउट अल्कोहल' (All About Alcohol) संग्रहालयात शेकडो फेनीचे प्रकार आणि बाटलीची कलाकृती आहेत. ज्यात मोठ्या, पारंपारिक काचेच्या भांड्यांचा समावेश आहे, ज्यात शतकांपूर्वी स्थानिक काजूचं हे मद्य साठवले गेले होते.
इथला 300 वर्षांचा इतिहास
नंदन कुडचडकर म्हणाले, 'संग्रहालय सुरू करण्यामागचा हेतू गोव्याच्या समृद्ध वारसा, विशेषत: फेणीची कथा आणि ब्राझील ते गोवा या वाइन ट्रेलचा वारसा जगाला अवगत करणे हा होता.' असे मानले जाते की, काजूचे झाड प्रथम ब्राझीलमधून गोव्यात 1700 च्या दशकात त्याच्या वसाहती शासक, पोर्तुगीजांनी आयात केली होती. त्यानंतर काजूला गोव्याच्या किनाऱ्यांवर लावले गेले ज्यानंतर फेणीनेही येथून मूळ धरले आहे.
संग्रहालय सुरू करण्यामागील त्यांच्या प्रेरणेबद्दल बोलताना कुडचडकर म्हणाले, "प्रेरणा सोपी होती, नेहमीप्रमाणे गोवात काहीतरी वेगळे दाखवण्याचा आनंद झाला. कॉस्मोपॉलिटन जागतिक प्रवासी गोव्याला भेट देतो आणि गोव्यापेक्षा भारतात कोणते चांगले ठिकाण आहे, जिथे आपण जगाला आमच्या वसाहतीतील पेयचा इतिहास, आदर आणि चव दाखवू शकतो."
'मसाला फेणी' गोव्यात प्रसिद्ध
काजू फेनी हे काजू सफरचंदातून काढलेल्या किण्वित रसातून डिस्टिल्ड केले जाते आणि हे गोव्यातील एक लोकप्रिय अल्कोहोलिक पेय आहे. काजूच्या फळांना शेतकरी बागांमधून कापतात. नंतर काजूच्या फळाचा रस पारंपारिक उपकरणे वापरून किण्वित आणि डिस्टिल्ड केला जातो.
एकदा डिस्टिल्ड केल्यावर, हा किण्वित रस 'उर्रक' नावाचा लोकप्रिय मादक पेय बनतो, तर डबल डिस्टिल्ड झाल्यावर या पेयाला फेनी म्हटले जाते. त्यानंतर या फेनीत लवंग, काळी मिरी, जायफळ, दालचिनी सारख्या मसाल्यांमध्ये मिसळून 'मसाला फेनी' नावाचा प्रकार बनवला जातो.
काजू फेणी ही देशातील पहिली स्वदेशी दारू
पाम ताडीपासून नारळ फेणी काढण्यासाठी देखील अशीच प्रक्रिया वापरली जाते. काजू फेणी ही भौगोलिक संकेत टॅग प्राप्त करणारी देशातील पहिली स्वदेशी दारु आहे, ही प्रक्रिया स्थानिक निर्मात्यांनी 2009 मध्ये सुरू केली होती.
फेनी, हे पेय सामान्यतः आणि किनारपट्टी राज्यातील स्थानिक रहिवाशांद्वारे वापरले जाते, गोवा सरकारने 2016 मध्ये राज्य वारसा पेय म्हणून याला अधिसूचित केले होते, जेणेकरून त्याच्या निर्मात्यांना स्कॉच आणि टकीलाच्या धर्तीवर जागतिक पातळीवर बाजारात आणण्यास प्रोत्साहित केले जाईल.