नवी दिल्ली : कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर ताण आल्यामुळे महागाई भत्ता थांबवण्यात आला होता. तो आता पुन्हा सुरू करण्यात आला आहे. केंद्रीय कर्मचा-यांना महागाई भत्ता पुन्हा सुरू करण्यात आला आहे.  1 जुलै 2021 पासून महागाई केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणार  आहे. याचा लाभ  50 लाख कर्मचारी, 65 पेन्शनधारकांना मिळणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांची राज्यसभेत माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेंन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना महामारीमुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021 असे तीन हप्ते रोखले होते. 



कोरोना काळात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा तीनवेळा  महागाई भत्ता रोखल्यामुळे सरकारचे जवळपास 37,530.80 रूपये वाचले. त्यामुळे कोरोना महामारीतील आर्थिक संकटांचा सामना करण्यासाठी मदत मिळाली. अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.