Diwali Bonus 2022: दिवाळी तोंडावर आली, की अनेकांनाच असंख्य गोष्टींचे वेध लागतात. कुणाला सुट्ट्यांचे, कुणाला कौटुंबीक भेटीगाठींचे तर कुणाला फराळाचे. बऱ्याचजणांना आणखीही एका गोष्टीचे वेध लागतात, ती म्हणजे दिवाळीत मिळणाऱ्या बोनसचे. अर्थात पगारासोबत येणाऱ्या वाढीव रकमेचे. (Jobs) नोकरदार वर्गात ही उत्सुकता या दिवसांमध्ये चांगलीच शिगेला पोहोचलेली असते. असंच काहीसं वातावरण एका प्रसिद्ध कंपनीमध्येही पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं थोडासा ट्विस्ट आहे. ही कंपनी बोनस देतेय खरं, पण तो त्यांच्या गुंतवणूकदारांना (Investment). असं म्हटलं जात आहे की, सौंदर्य प्रसाधनं (Cosmetics) तयार करणारी कंपनी Nykaa शेअर होल्डर्सना बोनस देऊ शकते. कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते. 


(Bonus Share) बोनस शेअरवर कोणतीही रक्कम आकारली जात नाही... 
नायकानं 28 सप्टेंबरला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (Bombay Stock Exchange ) मध्ये दिलेल्या माहितीनुसार बोर्डाकडून शेअर देण्यासाठी पोस्टल बॅलेट आणि अप्रूवलच्या आणखी काही पद्धतींनी गुंतवणूकदारांकडून परवानगी घेणार आहे. 


बोनस शेअर्स हे पूर्णपणे मोफत इक्विटी शेअर्स असतात. यामध्ये एखादी कंपनी त्यांच्या सद्यस्थितीतील गुंतवणूकदारांना असे शेअर्स देते. नायकानंही गुंतवणूकदारांना ही अनोखी दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. 


शेअर वॅल्सू... 
या कंपनीचा शेअर स्टॉक मार्केटमध्ये 10 नोव्हेंबर 2021 ला आला होता. या युनिकॉर्नचे शेअर  2001 रुपयांना लिस्ट झाले होते. हे त्यावेळी झालं जेव्हा कंपनीनं अवघ्या 1125 रुपयांना त्याची Issue Price ठेवली होती. यानंतरच्या काळात मात्र कंपनीचे शेअर कोसळले. 


अधिक वाचा : Dussehra 2022 : 'या' तीन गोष्टींचं गुप्तदान करा, दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रसन्न होईल साक्षात लक्ष्मी 


 


बोनस जाहीर केल्यानंतर या कंपनीचे शेअर 6 टक्क्यांनी वाढून 1350 रुपयांपर्यंत पोहोचले. सद्यस्थितीला या शेअरची व्हॅल्यू 1275 रुपये इतकी आहे. 


Nykaa Share Bonus का देतेय? 
गुंतवणूकदारांना आनंद देणं हा नायकाचा हेतू आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचं मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळं त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न नायकाकडून करण्यात आला आहे. 


Zee Business च्या वृत्तानुसार या बोनस शेअर्सचा गुंतवणूकदारांना फारसा फायदा होणार नाही. याऐवजी कंपनीकडून डिविडेंड (Dividend) देण्याबाबत विचार होणं गरजेचं होतं. किंबहुना नायका जास्त कमाई करतेय म्हणन बोनस देतेय असंही नाही. कारण आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये  या कंपनीनं 62 कोटी रुपयांचा नफा कमवला होता. 2021-22 मध्ये हे प्रमाण कमी होऊन 41 कोटी रुपये इतकं झालं होतं.