नवी दिल्ली : पब्जी फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. PUBG MOBILE INDIA गेम लॉंच करण्याची घोषणा PUBG Mobile ने केलीय. बऱ्याच काळापासून या घोषणेची वाट पाहीली जात होती. फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांनी याबद्दल घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत-चीन सीमा वादानंतर केंद्र सरकारने पब्जीसहीत २२४ चीनी एप्स बॅन केले होते. भारत सरकारने आयटी एक्टच्या आर्टीकल ६९ ए अंतर्गत हे एप्स बॅन केले होते. पण आता पब्जी खेळणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. 



पब्जीची पालक कंपनी क्राफ्टनने मायक्रोसॉफ्टसोबत या नव्या प्रोजेक्टसाठी हात मिळवणी केलीय. डेटा प्रायवसी आणि सिक्योरीटीवर भारत सरकारच्या नियमानुसार सेटअप तयार केला जाणार आहे. यामुळे युजर्सचा डेटा देशातच राहील. 


भारतात १०० मिलियन गुंतवणूक केली जाईल आणि भारतासाठी खास PUBG Mobile India गेम लॉंच केला जाईल अशी घोषणा साऊथ कोरियन कंपनी  Krafton Inc अंतर्गत असलेल्या PUBG Corporation कंपनीने घोषणा केली.