Good News: तुम्ही रेल्वेने प्रवास करता का? मग अशावेळी तुम्ही रेल्वेचं तिकीट कसं काढता. रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे तिकीटघरावर की ऑनलाईन. आता प्रवाशांसाठी रेल्वेने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. रेल्वे प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून अनेक बदल केले जातात. रेल्वे प्रवाशांच्या सुखसुविधांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. आता रेल्वेकडून प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल सर्वांकडे डेबिट कार्ड असतं. त्यामुळे आपण अनेक व्यवहार हे डेबिट कार्डने करतो. आता धावत्या ट्रेनमध्ये रेल्वेचे तिकीटसुद्धा डेबिट कार्डने काढू शकणार आहे. त्याशिवाय दंड पण भरता येणार आहे. यासाठी रेल्वे इलेक्ट्रॉनिक उपकरणांना 4G सोबत जोडलं जातं आहे. सध्याच्या उपकरणांमध्ये 2G सिम असल्यामुळे अडचणी येत आहेत. म्हणून रेल्वेकडून हा हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 


ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असते. त्यामुळे आता रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना हँडहेल्ड टर्मिनल्ससारख्या इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये 4G सिम बसवण्याची तयारी जोरदार सुरु आहे. यामुळे आता रेल्वे प्रवासी दंड किंवा भाडे डेबीट कार्डाने करु शकणार आहात. देशातील 36 हजारांहून जास्त ट्रेनमध्ये पॉइंट ऑफ सेल मशीन टीटींना देण्यात आली आहे.  या मशीनद्वारे टीटी दंड वसूल करु शकतात. तसंच स्लीपर आणि एसी भाड्यातील फरक काढून एक्सेस शेयर तिकीट घेऊ शकतात.