मुंबई : HDFC all set to merge with HDFC Bank : देशाच्या बँकिंग क्षेत्रासाठी सर्वात मोठी बातमी. हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आणि HDFC BANK यांचे विलीनीकरण होत आहे. HDFC बँकेत HDFC LTD चा 41 टक्के हिस्सा असणार आहे. छोट्या आणि मोठ्या गुंतवणूकदारांसाठी हा मोठा निर्णय आहे. (HDFC and HDFC bank have announced a transformational merger)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील आर्थिक वर्षीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत प्रक्रिया पूर्ण होईल, असे HDFC बँकेकडून सांगण्यात आले आहे. या नव्या घोषणेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 60 हजाराच्या पलिकडे केला आहे. तर निफ्टीचीही 18 हजाराच्या दिशेने घोडदौड आहे. तसेच बँक निफ्टीमध्येही 900 अंकांची उसळी पाहायला मिळत आहे.



गृहनिर्माण विकास वित्त निगम (HDFC) बोर्डाने त्यांच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपन्या एचडीएफसी इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड आणि एचडीएफसी होल्डिंग्स लिमिटेडचे एचडीएफसी बँक लिमिटेडमध्ये विलीनीकरण करण्यास मान्यता दिली आहे. एचडीएफसीने सांगितले की, प्रस्तावित व्यवहारामुळे एचडीएफसी बँकेला त्याचा गृह कर्ज पोर्टफोलिओ तयार करता येईल आणि सध्याच्या ग्राहकांना याचा फायदा होईल.