नवी दिल्ली : तुम्ही नोकरी सोडली असेल किंवा तुमचे पीएफचे खाते बंद असेल तर तुम्हाला त्याची चिंता करण्याची गरज नाही. या बंद खात्यांवर व्याज मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून चालू नसलेल्या खातेधारकांनाही आता व्याज मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भविष्य निर्वाह निधीतील (इपीएफ) गुंतवणूक ही सर्वांत सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. या निधीत गुंतवलेल्या पैशांवर फक्त चांगले व्याजच मिळते. शिवाय प्राप्तीकर वाचवण्यातही हा निधी महत्वाची भूमिका निभावतो. पण याचा लाभ बंद खात्यांना म्हणजे अॅक्टिव्ह नसलेल्या खात्यांना मिळत नव्हता, तो मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.


 इपीएफओने अॅक्टिव्ह नसलेल्या खात्यांवर व्याज देण्याचा निर्णय घेतलाय. कर्मचाऱ्यांनी इपीएफमध्ये पैसे गुंतवावेत यासाठी हा निर्णय घेतल्याचे इपीएफओ आयुक्त व्ही.पी. जॉय यांनी सांगितले. जर एखाद्या कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यानंतर तीन वर्षांनंतरही पैसे काढले नसतील तर त्याला व्याज मिळणार नाही.


एखादा कर्मचारी आपली नोकरी बदलतो. तेव्हा त्याचे खाते बंद होते. त्यानंतर तो कर्मचारी पुन्हा नव्याने खाते उघडतो. त्यामुळे आता खाते उघडण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य केलेय. खाते बंद होऊ नये, अशी आमची इच्छा आहे, अशी माहीत जॉय  यांनी दिली. 


भविष्यात जर कोणाकडे आधार कार्ड असेल तर देशातील कोणत्याही ठिकाणी नोकरी बदलली तरी अर्ज न करता खाते हस्तांतरित केले जाईल. ही व्यवस्था लवकरच लागू होईल, असे जॉय म्हणालेत.