मुंबई : सरकारने कोरोना व्हायरस या संकटाला पाहता नागरिकांना भविष्य निधी (पीपीएफ), आरडी आणि सुकन्या समृद्धी योजनेच्या खातेधारकांना पैसे भरण्याकरता पुढील तीन महिन्याची सवलत दिली आहे. अर्थ मंत्रालयाने शनिवारी यासंदर्भात ट्विट करून महिती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धी खात्यात २०१९-२० या कालावधीतील पैसे हा ३० जूनपर्यंत भरण्याची सवलत वाढवून देण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे की, सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरात लॉकडाऊनला पाहता छोटी बजत करणाऱ्या धारकांना पीपीएफ, आरडी आणि सुकन्या समृद्धीमध्ये सूट दिली आहे. 



कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे सरकारने लॉकडाऊनचा कालावधी देखील वाढवला आहे. आता ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. हातावर पोट असणाऱ्या आणि छोट्या व्यावसायिकांना अनेक आर्थिक प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. यामुळे केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.


या खात्यांमध्ये सक्रिय राहण्यासाठी दरवर्षी काही रक्कम खातेधारकांना यामध्ये भरायचे असतात. पैसे न भरल्यास त्यावर दंड आकारला जातो. काही खातेधारक हे आर्थिक वर्षाच्या शेवटाला या खात्यांमध्ये पैसे भरतात. यामुळे त्यांना आयकरमध्ये कलम ८० सी द्वारे सवलत प्राप्त होते.