मुंबई : लवकरच कोरोनाची  (Covid 3rd wave) तिसरी लाट धडकणार असल्याचं तज्ज्ञांकडून सांग्ण्यात येत आहे. ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी पर्यायाने त्यांच्या पालकांसाठी आनंददायी बातमी आहे. येत्या काही दिवसांमध्ये लहान मुलांना कोरोनापासूनचा धोका कमी होणार आहे. हा नेझल स्प्रे कोव्हिड 19 लस (Nasal spray COVID-19 vaccine)  नाकावाटे देण्यात  येणार आहे. ( Good News Russia tests nasal spray covid 19 vaccine for children 8-12 year  age group will benefit)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रशियात  कोरोनापासून बचावासाठी नाकावाटे कोरोना लस देण्याची चाचणी करण्यात आली. 8-12 या वयोगटातील मुलांसाठी ही लस उपयोगी ठरणार आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, "रशिया सप्टेंबरमध्ये ही लस लॉन्च करण्याची रणनिती आखत आहे. ही माहिती  स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करणाऱ्या वैज्ञानिकांनी दिली आहे.    


नाकावाटे लस 


TASS या वृत्तसंस्थेनुसार,  स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती  गामालेया इंस्टीट्युटमध्ये करण्यात येत आहे. अलेक्जेंडर गिंट्सबर्ग हे या संस्थेचे प्रमुख आहे.  गिंट्सबर्ग यांच्यानुसार, " हा एक खास स्प्रे असेल. जो इंजेक्शनद्वारे न देता थेट नाकावाटे देण्यात येईल. सूत्रांनुसार लहान मुलांना देण्यात येणारी ही खास लसीचं वितरण 15 सप्टेंबरपासून होणार असल्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे. 


कोणतेही दुष्परिणाम नाहीत 


रिसर्च ग्रृपने 8 ते 12 या वयोगटातील मुलांवर नाकावाटे प्रतिबंधक लस देऊन चाचणी केली. यामध्ये कोणालाही दुष्परिणाम जाणवले नाहीत.   
दरम्यान या चाचणीत किती मुलं सहभागी झाले होते, याबाबतची माहिती देण्यात आली नाही.  


भारतातही मुलांवर चाचणी सुरु


एम्स हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर कोरोना प्रतिबंधक लसीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. ही चाचणी 6 ते 12 या वयोगटातील मुलांवर करण्यात येणार आहे. या चाचणीत 5-10 मुलांचा समावेश असणार आहे. शनिवारपर्यंत 10 मुलांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. ही मुलं 12-18 या वयोगटातील आहेत.  


संबंधित बातम्या : 


प्रभावी Sputnik V सोबत बुस्टर डोस, डेल्टा वेरिएंटवरही वार करण्याचा दावा


चेहऱ्यावरील डेड स्किनने त्रस्त आहात... घरच्या घरी करा हे योग्य उपाय