मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण सुरूच आहे. गुरूवारी 1 नोव्हेंबर रोजी पेट्रोलची किंमत 0.18 पैसे तर डिझेलची किंमत 0.16 पैसे घसरली आहे. घसरणीनंतर खूप दिवसांनी दिल्लीत पेट्रोल 79.37 रुपये प्रती लीटर आणि डिझेल 73.78 प्रती लीटर विकत आहे. तर आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचा दर 84.86 रुपये प्रती लीटर आहे तर डिझेलचा दर 77.32 रुपये प्रती लीटर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 15 दिवसांपासून इंधनाच्या दरात कपात पाहायला मिळत आहे. मंगळवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 20 पैशांनी कमी होऊन 80 रुपये प्रती लीटरपेक्षा खाली पेट्रोलचा दर होता. 79.55 रुपये प्रती लीटर दर झाला होता. तर डिझेल 7 पैसे प्रती लीटर दराने कमी झाला होता. मंगळवारी डिझेलची किंमत 84.86 रुपयांवरून 77.32 रुपये प्रती लीटर झाला होता. 


केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं की, केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या अंतर्गत आणण्याचा विचार करत आहे. आम्ही याबाबत काम केलं आहे. पण पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत काही समस्या आहे.