नवी दिल्ली : सेल्फीचा मोह आवरला नाही तर तो किती महागात पडू शकतो, हे या घटनेतून दिसत आहे. कारण या घटनेत तरूणाने मालगाडीवर चढून सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला होता. या प्रयत्नात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरलीय. विशेष म्हणजे या थरारक घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील एकंगरसराय रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी मालगाडीचे नऊ डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर काही वेळातच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यावेळी काही तरुण रुळावरून घसरलेल्या डब्यांवर चढून सेल्फी काढत होते. या दरम्यानचं स्फोट होऊन दोघा तरूणांना विजेचा धक्का बसल्याची घटना घडली होती. या घटनेत  सुरज कुमार (22) या तरूणाचा मृत्यू झाला तर छोटू कुमार या तरूणावर रूग्णालयात उपचार सुरु असून तो मृत्यूशी झूंज देतोय. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
 
व्हिडिओत काय?
मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडहून येणाऱ्या कोळशाने भरलेल्या मालगाडीचे 9 डबे एकंगरसराय स्थानकाजवळ घसरल्याची घटना घडली होती. यावेळी सुरज कुमार आणि छोटू कुमार हे तरुण मालगाडीच्या डब्यावर चढून सेल्फी घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर मोठा आवाज होतो आणि आगीचा भडका उडतो आणि पुढच्याच क्षणात हे तरुण डब्याच्या छतावरून खाली पडू लागतात. विशेष म्हणजे रेल्वे ट्रॅकवरच्या तारेच्या संपर्कात मोबाईल आल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. 



दरम्यान जर तुम्हीही अशाप्रकारे सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असाल तर आताच सावधान व्हा. अन्यथा तुम्हालाही अशा अपघातांना सामोर जावे लागेल. त्यामुळे अशा जीवघेण्या सेल्फीपासून दुरचं रहा.