मुंबई : कोणत्याही प्रश्नाचे उत्तर कोणाकडे असेल तर गुगलकडे. यामुळेच गुगलचे प्रस्थ वाढले होते. आणि म्हणूनच गुगल अतिशय लोकप्रिय झाले. पण गुगल सर्च इंजिन इतकी मोठी चूक करतो तेव्हा काय करायचे? गुगलने अलिकडेच एक मोठी चूक केली आहे. गुगलची ही चूक ट्विटर युजर्सच्या लक्षात आली आणि मग त्यांना ट्रोलिंगची संधी मिळाली. 


माहिती बरोबर आणि फोटो मात्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल सर्च स्पेसमध्ये इंडिया फर्स्ट पीएम टाईप केल्यास नरेंद्र मोदींचा फोटो समोर आला. तर विकिपीडियाच्या विंडोत जवाहरलाल नेहरुंची माहिती होती. पण बाजूला येणारा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होता.
इतकंच नाही तर देशाचे पहिले अर्थमंत्री असे टाईप केल्यावरही चूकीचा फोटो समोर आला. इथेही माहिती बरोबर होती. मात्र फोटो अरुण जेटलींचा होता.



 


देशातील पहिले डिफेंस मिनिस्टर टाईप केल्यावर निर्मला सीतारामण यांचा फोटो समोर आला. सगळीकडे फोटोच चुकीचे येत होते. या संबंधिचे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर गुगलने आपली ही चूक सुधारली. मात्र त्यापूर्वी गुगलची ही चूक ट्विटरवर जबरदस्त ट्रोल झाली.



सगळीकडे मोदींचीचा फोटो


ही गडबड लक्षात आल्यावर युजर्सने विविध नावे टाईप करुन सर्च करण्यास सुरुवात केली. भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्रींचे नाव विचारल्यास इंदिरा गांधी आले मात्र फोटो नरेंद्र मोदींचा आला. इतकंच नाही तर महात्मा गांधींचे नाव गुगलवर टाईप केल्यावरही नरेंद्र मोदींचाच फोटो समोर आला आणि माहिती महात्मा गांधींबद्दल होती.