नवी दिल्ली : नोबेल विजेते मॅक्स बॉर्न यांच्या १३५ व्या जन्मदिवसानिमित्त गुगलने त्यांचे डुडल बनविले आहे. गेस्ट आर्टिस्ट काती झिलागी हिने हे डुडल तयार केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

११ डिसेंबर १८८२ ला जर्मनीत जन्मलेल्या मॅक्स बॉर्न यांना 'फंडामेंटल रिसर्च इन क्वांटम मॅकेनिक्स' साठी १९५४ साली त्यांना नोबेलने गौरविले गेले. 


क्वांटम मॅकेनिक्स या क्षेत्रातील योगदानासाठी त्यांची 'बॉर्न थेरी' आज क्वांटम फिजिक्सच्या प्रत्येक रिसर्चचा आधार असतो. 


भारताची संबंध 


यहुदी असल्या कारणाने जानेवारी १९३३ मध्ये त्यांना विश्व विद्यापीठातून बाहेर काढण्यात आले. सी.वी.रमन यांचा प्रस्ताव स्वीकारुन मॅक्स बॉर्न हे बंगळूरूला आले.


इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ते स्थायी पद घेऊ इच्छित होते. पण त्यांच्यासाठी पद रिक्त न झाल्याने त्यांना परत जावे लागले.