मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मार्च महिन्यापासूनच जगभरात अनेकदा लॉकडाऊन करण्यात आला. या काळात 'व्हिडिओ कॉल' या ऍपला खूप चांगली पसंती होती. व्हिडिओ कॉल हे ऍप आता सगळ्याच कंपन्यांनी स्विकारलेलं ऍप आहे. अनेक कंपन्या या ऍपच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसोबत मिटिंग घेतात. गुगलने आताच Google Meet ला Gmail सोबत इंटीग्रेटेड केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच नव्हे तर गुगलने आपल्या प्रीमियम व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग Google Meet सगळ्यांकरता मोफत ठेवलं आहे. महत्वाचं म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत हे ऍप मोफत वापरता येणार आहे. तसेच गुगलचा दुसरा व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म Duo हे स्मार्टफोन्सकरता आहे. 


रिपोर्टनुसार गुगल आपल्या Duo आणि Google Meet या दोन्ही ऍपला मर्ज करण्याच्या तयारीत आहे. येणाऱ्या काळात Duo हे ऍप Google Meet ला रिप्लेस करू शकतो. 


9to5google च्या रिपोर्टनुसार, याबाबतचा महत्वाचा निर्णय G Suite चे प्रमुख हावियर सोलटेरो यांनी घेतला आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, दोन व्हिडिओ कॉल ऍप्स असण्याचा काहीच अर्थ नाही. 


जेव्हा या दोन्ही ऍप्सचं विलगीकरण होतं होतं तेव्हा याला कोडनेम Duet असं देण्यात आलं होतं. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊननंतर व्हिडिओ कॉलची मागणी वाढत गेली. या काळात Zoom सर्वाधिक लोकप्रिय झालं. 



तोपर्यंत Google Meet G-Suite चा एक भाग होता. फक्त प्रीमियम इंटरप्राइज युझर्सचं याचा वापर करू शकत होते. वाढती मागणी पाहता मे महिन्यात Google Meet सगळ्यांकरता फ्री असल्याची घोषणा केली. यानंतर कंपनीने Gmail मध्ये इंटीग्रेट केलं आहे.