Google वर `या` 3 गोष्टी सर्च केल्यास, थेट जेलची हवा खावी लागणार
Google Tips And Tricks: तुम्ही गुगलवर या तीन गोष्टी सर्च करीत असाल तर तातडीने थांबवा... कारण या गोष्टी सर्च केल्याने तुम्हाला पोलीस अटक करू शकतात.
मुंबई : आपल्याला कोणतेही प्रश्न उद्भवल्यास आपण गुगलवर सर्च करतो. आजारपणापासून ते रेसिपीपर्यंत आपण अनेक गोष्टी गुगलवर सर्च करीत असतो. गुगलकडे अनेक प्रश्नांची उत्तरं असतात. परंतू तुम्हाला माहितीये का की, गुगलवरही काही गोष्टी काळजीपूर्वक सर्च करायला हव्या. नाहीतर तुम्हाला तुरूंगवास होऊ शकतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा गोष्टींबाबत सांगणार आहोत की ज्या गुगलवर कधीही सर्च करू नये... अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
बॉम्ब कसा बनवायचा ?
अनेकांना गुगलवर नको त्या गोष्टी सर्च करण्याची सवय अशते. त्यामुळेच तुम्ही बॉम्ब कसा बनवायचा इत्यादी संशयास्पद गोष्टी सर्च करू नका. कारण, या कामांवर सायबर सेलचे लक्ष असते. असे केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता. सुरक्षा एजन्सी तुमच्यावर कारवाई करू शकते. या गुन्ह्यामुळे तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते.
चाइल्ड पोर्न
भारत सरकार चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत अतिशय कडक आहे. गुगलवर चाइल्ड पॉर्न शोधणे, पाहणे किंवा शेअर करणे हा गुन्हा आहे. यासंबंधीच्या कायद्यांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.
गर्भपात कसा करायचा
गुगलवर गर्भपाताच्या पद्धती शोधणे देखील गुन्ह्याच्या श्रेणीत येते. तुम्ही चुकूनही याविषयी सर्च करू नका. भारतीय कायद्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गर्भपात करता येत नाही.