मुंबई : आजकाल चेकबूक (Check Book) पेक्षा लोक एटीएममधून पैसे काढणे (ATM Withdraw Money) जास्त सोयीस्कर समजतात. यामुळे वेळेची बचत देखील होते. मात्र अनेकदा ग्राहकांना एटीएममधून पैसा (ATM money) काढताना फाटलेल्या नोटा हातात येतात. या नोटा हातात आल्या की नेमकं काय करावं? या फाटलेल्या नोटा बदलायच्या कशा ? असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडत असतात. त्यामुळे जाणून घेऊयात या नोटा कशा बदलाव्यात.  


...तर बँकेला बसणार दंड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरबीआयने (RBI) एटीएममधून फाटलेल्या जुन्या नोटा (Money Exchange) बदलण्यासाठी नियम केले आहेत. या नियमानुसार, बँक एटीएममधून काढलेल्या फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. जुलै 2016 मध्ये आलेल्या एका परिपत्रकानुसार, जर बँकांनी फाटलेल्या नोटा बदलून (Money Exchange) देण्यास नकार दिला तर त्यांना 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. 


बँकच जबाबदार


एटीएममधून (ATM) फाटलेली अथवा बनावट नोट बाहेर पडल्यास त्याची जबाबदारी बँकेची असते. तसेच नोटेवर अनुक्रमांक, महात्मा गांधींचा वॉटरमार्क आणि गव्हर्नरची शपथ दिसल्यास बँकेला कोणत्याही परिस्थितीत नोट बदलून द्यावी लागेल.


किती नोटा बदलता येतात?


नोटा बदलण्यासंदर्भातही (Money Exchange) नियम आहेत. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलू शकते. तसेच या नोटांची किंमत 5 हजारापेक्षा जास्त नसावी.  


फाटलेल्या नोटा कशा बदलायच्या? 


ज्या बँकेच्या एटीएममधून तुम्ही नोटा काढल्या आहेत त्या बँकेत जावे लागेल. बँकेत गेल्यानंतर तुम्हाला एक अर्ज लिहावा लागेल, ज्यामध्ये तुम्हाला पैसे कोठून काढले गेले याची तारीख, वेळ आणि ठिकाण लिहावे लागेल.यानंतर अर्जासोबत एटीएम ट्रान्झॅक्शन स्लिपही जोडावी लागेल. जर स्लिप जारी केली नसेल तर मोबाईलवर मिळालेल्या व्यवहाराची माहिती द्यावी लागेल. यानंतर बँक तुमच्या नोटा बदलून देईल.विशेष म्हणजे, खराबपणे जळलेल्या, फाटलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकत नाहीत. अशा नोटा रिझर्व्ह बँकेच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा कराव्या लागतात. 


दरम्यान ग्राहकांना जर फाटलेल्या अथवा बनावट नोटांची (Money Exchange) समस्या जाणवल्यास त्यांना वरील माहितीद्वारे नोटा बदलता येणार आहेत.