COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बंगळुरू : कर्नाटकमध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. उद्या भाजपाचे बी.एस. येडियुरप्पा यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. बंगळुरूमधल्या स्टेडियममध्ये हा जंगी सोहळा होणार आहे. या निर्णयामुळे काँग्रेसनं संताप व्यक्त केला असून राजभवनावर निदर्शनं करण्याचा इशारा देण्यात आलाय. तसंच या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारीही काँग्रेसनं केलीये. दरम्यान, सर्व आमदार काँग्रेससोबत असून कुमारस्वामींवर कुणीही नाराज नसल्याचा दावा ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. 


तर भाजपच्या आमदारांची बैठक आज संपन्न झाली. त्यात येडीयुरप्पांची विधीमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. . त्यानंतर येडीयुरप्पा पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा सादर करण्यासाठी राज्यपालांना भेटीला गेले. येडियुरप्पांनी राज्यपालांची भेट घेतल्यावर सकारत्मक निर्णय होईल असा विश्वास व्यक्त केला


काँग्रेसचे सर्व आमदार अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत, घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेसने सावधगिरी पाळल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व आमदारांची रिसॉर्टवर रवानगी करण्यात आली आहे.