नवी दिल्ली : नोकरीच्या ठिकाणी हल्लीच्या दिवसांणध्ये पगाराला महत्त्वं दिलं जाण्यासोबत कर्मचाऱ्यांच्या वाट्याला येणाऱ्या सोयीसुविधा आणि सवलतींप्रमाणेत आणखी एका मुद्द्याचीही दखल घेतली जाते. हा मुद्दा म्हणजे नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या सुट्ट्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हल्लीच्या दिवसांमध्ये सहासा नोकरीच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून एका आठवड्यातील पाच दिवस अनुक एका कालावधीत काम करुन घेण्यात येतं. आठवड्याअखेर म्हणजेच शनिवार आणि रविवारी कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात येते. बहुतांश ठिकाणी कामाची हीच पद्धत अवलंबात आणली जाते. कॉर्पोरेट कंपन्यांसोबतच सरकारी कर्मचाऱ्यांनाही याचा फायदा मिळत आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. 


पण, आता मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली पाच दिवसांच्या आठवड्याची मुभा काढून घेण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत, काही प्रसंगी होणारा ढिसाळ कारभार पाहता आता पुन्हा एकदा त्यांच्या कामाचा आठवडा पाचवरुन सहा दिवसांचा करण्याचं सिक्कीम राज्य सरकारकडून ठरवण्यात आलं आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळत आहे. 



सरकारी आणि नागरी विभागात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना यापुढे फक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असेल. इतर आठवड्यांमध्ये त्यांना सहा दिवस काम करावं लागणार असून आठवड्यातून रविवारच्या एकाच दिवशी सुट्टी असेल. १ एप्रिलपासून हा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 


वाचा : पुरुषात दडलेली आई ठरली 'जगात भारी'


मागील वर्षीच मुख्यमंत्री प्रेमसिंह तमंग यांनी राज्य सरकार आणि नागरी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाच दिवसांच्या आठवड्याची मुभा दिली होती. पण, बदललेली परिस्थिती आणि काम करण्याची सुस्तावलेली पद्धत पाहता आता ही मुभा काढून घेण्यात येत आहे.