मुंबई :  रक्तदान हे महादानांपैकी एक समजले जाते. रक्तदान केल्याने गरजवंतांचे प्राण वाचवले जातात सोबतच  रक्तदात्यालाही त्याचा फायदा होतो.  
रक्तदानाचे आरोग्यदायी फायदे असले तरीही  बलाढ्य लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या देशामध्ये मात्र रक्तदानाबाबत पुरेशी सजकता नाही. 


सरकारचा नवा नियम  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकार त्यांच्या कर्मचार्‍यांना रक्तदानादिवशी भरपगारी रजा देत होते. मात्र आता सामान्य रक्तदानासोबतच एफेरेसिस रक्तदान apheresis donation साठीदेखील भरपगारी रजा देण्याची मुभा देण्यात आली आहे. ही माहिती पर्सनल मिनिस्ट्रीने दिली आहे.  


एफेरेसिस रक्तदान म्हणजे काय ?  


एफेरेसिस रक्तदान म्हणजे या रक्तदानामध्ये रक्तासोबतच प्लेटलेट्स, प्लाझ्मा यासारखे घटकही दान  केले जातात. काही आजारांमध्ये शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमजोर झाल्यानंतर प्लेटलेट्सची संख्या कमि होणं रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांमध्ये रक्तदनासोबतच प्लेटलेट्स, प्लाझ्मा सारखे काही अवयवदान करण्याबाबत जागृती करणं आवश्यक आहे.   


अट काय ? 


सामान्य रक्तदानासोबत असे रक्तदान हे स्पेशल कॉजल लीव्हसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.  
लायसन्स असलेल्या ब्लड बॅंकेमध्ये रक्तदान करणं आवश्यक आहे. 
अशाप्रकारचे रक्तदान वर्षात कमाल चार वेळा केल्यास आणि त्याचा योग्य पुरावा सादर केल्यास कर्मचार्‍याला भरपगारी रजा दिली जाणार आहे.